#

Advertisement

Monday, January 19, 2026, January 19, 2026 WIB
Last Updated 2026-01-19T14:26:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी "नवा पॅटर्न"

Advertisement

महाविकास आघाडीची खलबते 

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. यासाठी संयुक्त बैठकीत नऊ पैकी सात तालुक्यातील सात तालुक्यातील जागा वाटपात एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. बैठकीला ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, खासदार कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे तर वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांची उपस्थिती होती. जागा वाटपाची चर्चा आज पूर्ण होईल असे ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर विचारले असता दानवे म्हणाले की ते पण आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांना एकत्रितपणे आपण सामोरे गेले पाहिजे असं मत सगळ्यांचे आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका आम्ही ठेवतोय. व्यक्तिगत आमचा कोणाचा शत्रू नाही, मात्र या ( शिंदे शिवसेना आणि भाजपा ) राजकीय पक्षांच्या विरुद्ध लढले पाहिजे आणि आम्ही लढत आहोत.