#

Advertisement

Monday, January 19, 2026, January 19, 2026 WIB
Last Updated 2026-01-19T12:09:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपूर 'त्या' गूढ आवाजामुळे हादरले

Advertisement

नागरिक भीतीच्या छायेत 

पंढरपूर : पंढरपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीतीचं सावट पसरलं आहे. पंढरपूरात आज दिवसभरात दोन वेळा मोठा गूढ आवाज आला. हा आवाज मागील चार दिवसांपासून येत असल्याची माहिती आहे. हा आवाज नेमका कसला आहे? कशामुळे हा आवाज आला? याबाबतचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. या आवाजामुळे पंढरपूर शहरासह उपनगरातीलही काही भाग हादरून गेला आहे.
पंढरपूरमध्ये आज सकाळी 10.15 आणि दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास गुढ असा मोठा आवाज झाला. एखाद्या स्फोटाप्रमाणे असणारा आवाज पंढरपूरकरांना काही क्षणासाठी भयभीत करून गेला. या आवाजामुळे घराच्या काचा तसेच झोपडपट्टी परिसरात भांडीही कडाडली असल्याचे बोलले जात आहे.पंढरपुरात आलेले भाविक देखील या आवाजामुळे काही काळ घाबरले होते. या आवाजामुळे साहजिकच अनेकांना भूकंप झाल्याचा आभास झाला. त्यामुळे पंढरपूर मध्ये आलेला आवाज हा नक्की कशाचा होता? याबाबत चर्चा सुरु आहे.
गुढ आवाजाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता पंढरपूर स्थानिक प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांच्यामार्फत या आवाजाचा शोध सुरू आहे. नक्की हा आवाज भूगर्भातील काही बदलांमुळे आला आहे का ? किंवा आसपासच्या परिसरात नक्की कुठे काय झाले? भूकंप सदृश्य परिस्थिती झाली का ?याचं संशोधन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक प्रशासन करत आहे.