Advertisement
सांगली : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपविरोधी मूठ बांधून आजी-माजी आमदार एकत्र येत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष, तसेच शिवसेना ठाकरे गटाने येत गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गट स्थापन केला आहे. जतचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. या युतीच्या जागावाटपसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज जत येथे भाजपविरोधी आघाडीची बैठक पार पडली आहे यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी या आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा या बैठकीत केला. गुंडशाही धनशक्तीचे विरोधात जनशक्ती उभारणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. या निवडणुकीत 9 जिल्हापरिषद आणि 18 पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. होऊन गेलेल्या नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या चुकांमुळे आपला पराभव झाला आहे. स्वतंत्र लढल्यामुळे सत्तेचे गणित जुळले नव्हतं, आता सत्तेसाठी भाजप विरोधी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सर्वपक्ष एकत्र आले आहेत.
