#

Advertisement

Saturday, January 17, 2026, January 17, 2026 WIB
Last Updated 2026-01-17T11:50:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीतून सर्वात मोठी घोषणा

Advertisement

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार 

बारामती : पुणे-पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले असलेल्याच शहरांमध्ये पवार काका-पुतण्याचा भाजपने धोबीपछाड केला. या मोठ्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.
बारामतीत आज कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार, जयंत पाटील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंनी आगामी निवडणुका एकत्र लढत असल्याचे स्पष्ट केले आहे.
येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.  त्यासोबतच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सांगत महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असं शशिकांत शिंदे म्हणाले.