#

Advertisement

Tuesday, January 20, 2026, January 20, 2026 WIB
Last Updated 2026-01-20T13:43:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केले !

Advertisement

जयकुमार गोरेंची टीका, दोन नगरसेवक संभाळण्याचा दिला सल्ला 

सोलापूर : सोलापुरात काँग्रेस महाविकास आघाडीचे दोन खासदार असूनही पक्षाला महापालिका निवडणुकीत मानहानीकारण पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका होत आहे. त्यातच, पालकमंत्री तथा भाजप नेते जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली. तत्पूर्वी, प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे हे काँग्रेस कार्यकर्ता होते, याची आठवण तरुन दिली होती.
मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केलं. आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळं प्रणिती शिंदेनी केलं, अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली.
ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती त्या त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. त्यामुळे दोन नगरसेवक आल्यावर देखील समाधान वाटतय. 87 नगरसेवक आलेल्या भाजपवर त्या टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारण नाही, एवढा मोठा पराभव झाला तर ते स्वीकारायाला हवं. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटलं, त्यावेळी त्या सन्मानाने बोललं होतं का? तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करा मग तुमचा ही सन्मान होईल, असा पलटवारही गोरेंनी केला. मी जिथे आहे तिथे चांगलं काम करतो, ताईंनी आत्मपरीक्षण करावं, कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता. बघा आपला घरं आणि अवस्था काय आहे,दोन नगरसेवक आलेत त्यांना आधी टिकवा, अशा शब्दात गोरेंनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.