#

Advertisement

Wednesday, January 21, 2026, January 21, 2026 WIB
Last Updated 2026-01-21T11:34:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कुस्ती फक्त पैलवानासोबत होते !

Advertisement

भाजप नेत्याने कुणाला हिणवले, वाद पेटणार ? 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये दोन पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील तर दुसरे आहेत भाजपचे माजी आमदार राजन पाटील. या दोघांमधला राजकीय संघर्ष सर्वांना माहित आहे. त्यात आता उमेश पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी राज पाटील यांना आपल्या विरुद्ध लढण्याचे आव्हान दिले होते. त्याला राजन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने दोन्ही पाटलांमधील वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
मोहोळचे माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलावर जोरदार टीका केली आहे. कुस्ती पैलवानासोबत होते, असं म्हणत त्यांनी टाळी वाजवली. पुढे ते म्हणाले अशां सोबत कुस्ती कशी काय होऊ शकते. राजन पाटील यांनी असे वक्तव्य करत  उमेश पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले होते. मात्र  चॅलेंज आपल्या बरोबरच्या माणसाचे स्वीकारायचे असते, कोणाचेही चॅलेंज स्वीकारलं तर लोकं हसतील असा टोला राजन पाटील यांनी लगावला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहोळ तालुक्यात राजन पाटलांच्या नेतृत्वात भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तर दुसरीकडे उमेश पाटलांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीच्या मैदानात आहेत. मोहोळ तालुक्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे.  मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 3 जागावर राष्ट्रवादी, दोन जागावर शिवसेना तर एका जागेवर शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत.