Advertisement
लक्ष्मी दहिवडी गटातून भरला अर्ज ; सर्वस्तरातून पाठिंबा
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लक्ष्मी दहिवडी गटातून माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या गटातून एकुण 9 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी भाजपच्या उमेदवार करूणा शिवशरण यांच्याशीच अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची थेट लढत असणार आहे. परंतु, या गटात पक्षीय राजकारण बाजुला ठेवले तर अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे पारडे जड वाटत आहे. या गटात प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे कार्य मोठे आहे. यासह समाजाने यापूर्वीच आपला पाठिंबा अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना जाहीर केला आहे. याशिवाय स्व. अनुराधा ढोबळे यांची 2017 मध्ये या गटातून बिनविरोध निवड होणार होती परंतु, ऐनवेळी विरोधकांनी उमेदवार दिल्याने समाजावर निवडणूक लादली गेली, नंतरच्या काळात स्व. अनुराधा ढोबळे यांचे निधन झाले, आता त्यांच्या कन्या अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना विजयी करून गतवेळी विरोधकांनी केलेल्या राजकारणाची परतफेड करायची, असा ठाम विश्वास या गटातील नागरिक व्यक्त करून दाखवित आहेत, तसेच, अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे कार्यही या गटात मोठे आहे. त्या स्वत: सुशिक्षीत आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, यासह पक्षाचे आजी-माजी आमदार, नगरपरिषेदेचे नेते, पदाधिकारी यांचा पाठिंबा असल्याने अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे या गटातील प्रत्येक गावातून विजयी आघाडी घेऊ शकतात.
अॅड. कोमलताई या आईची सावली...
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या आई कै. अनुराधा यांच्याप्रमाणे आहे. लहानपणापासूनच त्यांनी वडीलांसह दौरे ते व्यासपीठावर त्यांची उपस्थिती अनेकांनी पाहिलेली आहे. आई प्रमाणेच सामान्यातील सामान्य लोकांत, कुटुंबात मिसळणे तसेच समाजातील माणसांची काळजी घेणे, असे गुण त्यांच्यातही दिसतात. आईच्या निधनानंतर त्या वडीलांचा आधार म्हणून अनेक ठिकाणी पुढे आल्याचे सर्वांनी पाहिले आहे. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी वडीलांचे कार्य केवळ मतदार संघातच नव्हे तर राज्यभरात सुरू ठेवले आहे. 15 हजार महिलांचा उमंग महिला महोत्सवाचे महिलाराज दृश्य न भुतो न भविष्य, असे तालुक्याने पाहिले आहे. यासह आरोग्य शिबीर, टोल विरोधी आंदोलन, बार्टीतील भ्रष्टाचार आंदोलन, वाढीव वीजबील विरोधी आंदोलन, बचतगट मेळावे असे जनकल्याणाचे उपक्रम त्यांनी शाहू परिवाराच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविले आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक जण मुहूर्तावर कामे करतात परंतु, अॅड. कोमलताई यांच्याकडून कामांचा ओघ गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या कार्यरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.
ऍड. कोमल लक्ष्मण ढोबळे, शिला शिवशरण, कविता दत्तात्र्यय खडतरे, दामिनी शुभम शेवडे, करुणा जनार्धन शिवशरण, मंगल शिवाजी शिवशरण, उज्वला लक्ष्मण मस्के, कांचना शरद शिंदे, कविता दत्तात्र्यय खडतरे.
पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार :
महादेवी राजकुमार मेतकुटे, महादेव शंकर ढोणे, दीपक मच्छिन्द्र आसबे, हणमंत कृष्णा क्षिरसागर, सुरेश बापू भाकरे, विनायक माधवराव यादव, रोहिणी विनायक यादव, काशीलिंग हनुमंत रणदिवे, विक्रम तुकाराम यादव, काकासाहेब मोहनराव मोरे, सुजाता संजय पवार, दादासो नंदू गायकवाड, लव्हाजी दिलीप लेंडवे, सिद्धेश्वर बबनराव आवताडे, प्रणाली सिद्धेश्वर आवताडे, विलास मलकू पाटील.
