Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस चौकशीवर ठाम
मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी चर्चा ही सुरू झाली आहे. रोहित पवारांनी तर हा अपघात नाही तर घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. काही शक्यता ही त्यांनी वर्तवल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन ही देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, पार्थ पवार उपस्थित होते.
दरम्यान, ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याची चौकशी सुरू झाली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण सीबीआय सारख्या स्वायत संस्थेकडूनच याची चौकशी झाली पाहीजे अशी आपली भावना आहे. तसे झाल्यास या अपघाताचा तपास अधिक व्यापक पद्धतीने होवू शकतो. शिवाय त्यांना परदेशातील काही केसची ही मदत यात होवू शकते. वेगवेगळ्या देशात अशा पद्धतीचे अपघात झाले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. काही झालं तरी या अपघाताचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तो झालाच पाहीजे. शिवाय या अपघातानंतर जे जे मुद्दे उपस्थित झाले त्यांच्यासह तपास झाला पाहीजे. नुसता तपास नको तर तो जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्याचा निष्कर्ष देशा समोर ठेवला पाहीजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमीका आहे.
