Advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला १९ दिवस पूर्ण झाले आहेत. अजित दादांच्या अपघाताची योग्य ती तपासणी करावी अशी मागणी करीत आहेत. विमान अपघातानंतर त्याचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला जातो. यामुळे अपघात कसा घडला, त्यावेळी विमानात काय परिस्थिती होती याची माहिती कळते. यामुळे पुढील तपासाचा मार्ग निश्चित करता येतो.
मात्र, अमोल मिटकरी यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलंय, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण होत आहे. आता ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजते. आम्ही वाट पाहू, पण तोपर्यंत विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीतून निघाले, कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा २८ जानेवारी २०२६ चा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती.
