#

Advertisement

Friday, February 20, 2026, February 20, 2026 WIB
Last Updated 2026-02-20T11:30:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबई येथे "राष्ट्रवादी"ची प्रदेशस्तरीय बैठक

Advertisement

एकजुटीने काम करण्याचा निर्धार :  उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला व युवती विंगची प्रदेशस्तरीय बैठक गुरवारी (ता.१९) झाली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नवीन पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला, असे महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आणि युवती विंगची बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांशी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आगामी कार्यक्रम, जनसंपर्क उपक्रम आणि महिला-युवती संघटन बळकटीकरणाच्या विविध मुद्द्यांवरही संवाद साधण्यात आला. या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह विविध विषयांवर संवाद साधण्यात आला, काही महिला पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी देण्यात आली, या बैठकीस पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.