#

Advertisement

Friday, February 20, 2026, February 20, 2026 WIB
Last Updated 2026-02-20T11:53:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ३५० कोटी

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी अंतर्गत भुरीकवठे, वाागदरी, अक्कलकोट, नागणसूर आणि तोळनूर असे दोन्ही राज्याच्या सीमेलगत व कर्नाटकच्या सीमेपर्यतच्या 47.663 किमी या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारने (353.23 कोटी) ३५० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या कामाला मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली. महाराष्ट्र व कर्नाटकलगतच्या आंतरराज्य माग र् या रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी 353 कोटी 23 लाख रूपयेची निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीच्या निधीचीही तरतूद केली आहे. या रकमेतून 47.663 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचे रुंदीकरण केली जाणार आहे. या मार्गावरील वाढत्या वाहतुकीचा विचार करून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच, वागदरी येथे बाह्यवळण रस्ता केला जाणारआहे. सांगवी येथे नवीन मोठ्या पुलालाही मंजुरी दिली आहे. यामुळे, येथे मोठा पूल होणार आहे. या पुलामुळे व वागदरीत होणाऱ्या बाह्यवळणाच्या रस्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षित, वेगवान व सुरळीत होणार आहे.