#

Advertisement

Wednesday, February 25, 2026, February 25, 2026 WIB
Last Updated 2026-02-25T11:30:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शासनाच्या शालेय योजनांचे माहिती फलक लावा

Advertisement

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आदेश 

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत याकरीता प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, एससीईआरटीचे  संचालक हेमंत वसेकर,  माध्यमिक  शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव तुषार महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह  तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉस्को कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा २ हजार २५० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करोना कालावधीत सुरू केलेली योजना नियमित स्वरूपात सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.