Advertisement
एका दशकानंतर पहायला मिळणार उजव्या विचारसरणीचं नेतृत्त्व
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) निवडणुकीत यंदा मोठा राजकीय रंग पाहायला मिळाला. तब्बल 10 वर्षांनंतर मसापच्या कार्यकारिणीवर सत्तापालट झाला असून ‘साहित्य संवर्धन’ पॅनलने बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. या निकालामुळे साहित्य क्षेत्रातही नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत शेवटच्या मतमोजणीपर्यंत उत्सुकता कायम होती. दरम्यान निकालानंतर विजयी पॅनलकडून जल्लोष साजरा करण्यात आला, तर काही पराभूत पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र या निकालावरून काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यातून नवे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाहेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर ‘साहित्य संवर्धन’ पॅनलचे प्रमुख ‘राजेश पांडे’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला. या पॅनलने सत्ताधारी ‘परिवर्तन उत्कर्ष’ पॅनलचा पराभव करत मसापमध्ये मोठा सत्ताबदल घडवून आणला. तब्बल 10 वर्षांनंतर परिषदेत नवीन नेतृत्व निवडून आले आहे.
अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत ‘योगेश सोमण’ यांनी अल्प फरकाने विजय मिळवला. त्यांनी ‘प्रा. मिलिंद जोशी’ यांचा पराभव करत अध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीत एकूण 10901 मतदान झाले होते. त्यापैकी 10713 मते वैध ठरली, तर 188 मते अवैध घोषित करण्यात आली.
प्रमुख कार्यवाह पदासाठी ‘स्वाती महाळंक’ यांनी 5414 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या ‘सुनीतराजे पवार’ यांना 5285 मते मिळाली. तर कोषाध्यक्ष पदासाठी ‘प्रदीप निफाडकर’ यांनी 5536 मते मिळवत ‘विनोद कुलकर्णी’ यांचा 5168 मतांनी पराभव केला. स्थानिक कार्यवाह मंडळातही याच पॅनलचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर विजयी झाले. प्रमुख कार्यवाह पदासाठी ‘स्वाती महाळंक’ यांनी 5414 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या ‘सुनीतराजे पवार’ यांना 5285 मते मिळाली. तर कोषाध्यक्ष पदासाठी ‘प्रदीप निफाडकर’ यांनी 5536 मते मिळवत ‘विनोद कुलकर्णी’ यांचा 5168 मतांनी पराभव केला. स्थानिक कार्यवाह मंडळातही याच पॅनलचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर विजयी झाले.
दरम्यान, या निकालानंतर काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्रोही विचारांचे लेखक ‘संजय सोनवणी’ यांनी निवडणुकीदरम्यान राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला. या निषेधार्थ त्यांनी मसापच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
