Advertisement
टिळकांचे वंशज शिवसेनेत प्रवेश करणार
पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली नाही तर पुण्यात आहे. टिळक कुटुंबीयांनी काँग्रेसला अखेर रामराम केला आहे. टिळकांचे वंशज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. "शिवसेनेनं जबाबदारी दिली तर स्वीकारणार" अशी घोषणाच रोहित टिळकांनी केली आहे.
शिवसेनेकडूनच मला राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा झाली म्हणून मी त्यादिवशी मुंबईला फॉर्म भरायलाही गेलो होतो. पण, मविआकडून शरद पवार यांचे नाव पुढचं सगळंच थांबलं. पण, तरीही भविष्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्विकारेल, अशी घोषणा रोहित टिळक यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केली. तसेच काँग्रेसचं काम मी आता थांबलल्याचंही त्यांनी प्रथमच जाहिर करून टाकले. आमच्या संस्थेला लोकमान्य टिळकांचा वारसा असल्याने पुरस्कार देताना आम्ही कधीच पक्षीय अभिनिवेश ठेवला नव्हता पण मध्यंतरी आम्ही पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार काय दिला आणि तेव्हापासून काँग्रेस नेतृत्वाने आमच्याशी अंतर ठेवायला सुरू केलं. खरंतर याबाबत आम्ही थेट काँग्रेस हायकमांड पर्यंत आमची बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील अनेकदा करून पाहिला. पण तरीही उपयोग झाला नाही म्हणूनच मग नाईलाजास्वत आम्हाला या निर्णयाप्रत यावं लागलं. राज्यसभेला सेनेतर्फे आमचं नाव चर्चेत आल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी आमच्याशी संपर्कही साधला पण आता माघार नाही हे आमच्या बाजून ठरवून झाल्याने काँग्रेससोबतची टिळक फँमिलीची नाळ आता कायमची तुटल्यात जमा हे, असंही रोहित टिळक म्हणाले.
