#

Advertisement

Tuesday, March 10, 2026, March 10, 2026 WIB
Last Updated 2026-03-10T14:15:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा

Advertisement

महाराष्ट्रात 180 दिवसांची प्रसूती रजा आणि एक वर्षापर्यंत सुट्टी 

मुंबई : राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोठी घोषणा केली आहे.  महाराष्ट्रात महिलांसाठी नवा कायदा आणला जाणार आहे. यासह राज्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.  180 दिवसांची प्रसूती रजा आणि मेडिकल प्रमाणापत्राशिवाय एक वर्षापर्यंत सुट्टीअशी तरतूद करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. केंद्र शासनाच्या धर्तीवर महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे. गरज भासल्यास 1 वर्षांपर्यंत देय अर्ध वेतन रजा कोणत्याही मेडिकल प्रमाणापत्राशिवाय मिळणार आहे. मातृत्व सन्मानासाठी या योजनेची अंमलबजवणी केली जाणार आहे. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सभागृहात पहिलेच भाषण : महिलांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याबाबत आभारी आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ही घोषणा करत आहोत. महिला आयोग रिक्त जागा भरण्याबाबत अमोल मिटकरी यांनी सांगितलं] यावर उचित कार्यवाही केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. घरेलू महिलांसाठी शासन मदतीसाठी प्रयत्नशील आहे, 5 हजार महिलांना भांड्याच वाटप करण्यात आलं आहे. एकल महिला समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. चौथे महिला धोरण लागू करण्यात आले आहेत. याच्या प्रभावी अमलबजावणी साठी समिती नेमण्यात आली आहे. कोणत्या खात्याला किती दिवसांत काम पूर्ण करायचे आहेत याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही पवार यांनी सांगितले.