#

Advertisement

Wednesday, March 11, 2026, March 11, 2026 WIB
Last Updated 2026-03-11T14:23:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांच्या 'खांद्यावर हात टाकणारी व्यक्ती' परदेशात?

Advertisement

अमोल मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केले प्रश्न 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात 28 जानेवारी रोजी मृत्यू झाल्यापासून या अपघाताबद्दल शंका उपस्थित करणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोर मिटकरींनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या व्यक्तीबद्दल विधान केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्रसिद्धी आणि जाहिरातींचे काम करणाऱ्या "डिझाईन बॉक्स" कंपनीच्या नरेश अरोरा संदर्भात मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नरेश अरोरा एक पद सांभाळायचे. त्यांनीच गुलाबी जॅकेट दादांना दिले, त्यांनी दादांना पुष्पगुछ देऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकला होता. सगळ्या पक्षाच्या स्ट्रॅटजी ते ठरवत होते, असं म्हणत मिटकरींनी अरोरा यांचा पक्षात काय दर्जा होता आणि किती वजन होतं याबद्दल सांगितलं. आता अजितदादांच्या निधनानंतर नरेश अरोरा फक्त एक-दोन दिवस दिसले, आत्ता ते कुठे आहेत? असा प्रश्न मला पडला म्हणून मी ट्वीट केलं, असे अमोल मिटकरी म्हणाले. नरेश अरोरा महाराष्ट्रमध्ये आहेत की देशाबाहेर आहेत ते माहित नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर ते कुठे दिसले नाहीत, असे मिटकरी म्हणाले. खरंतर या आमच्या दु:खात त्यांनी सोबत राहायला हवं होते, त्यांनी काही पोस्ट किंवा त्याबद्दल काही बोलायला हवे होते. मात्र, ते कुठे आहेत? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असंही मिटकरींनी म्हटले.