#

Advertisement

Friday, March 6, 2026, March 06, 2026 WIB
Last Updated 2026-03-06T14:10:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरमध्ये भरणार महिला ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा

Advertisement

सोलापूर : महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत कुस्तीला महत्त्व आहे. पुरुषांच्या कुस्तीइतकीच आता महिलांची कुस्तीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, यंदाची ‘चौथी महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा सोलापूरात रंगणार आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सिद्धेश्वर पेठ येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा कुस्तीचा महासंग्राम होणार आहे.
सोलापुरातील निर्झरा केअर फाउंडेशनकडे स्पर्धेचे यजमानपद सोपवण्यात आले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू आणि पोलीस अधिकारी दिवंगत सिद्धाराम साखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यातील 42 जिल्ह्यांतून सुमारे 400 हून अधिक महिला या स्पर्धेत आपली ताकद अजमावतील. यामध्ये सर्वांच्या नजरा तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या भाग्यश्री फंड हिच्यावर खिळल्या आहेत. ही स्पर्धा एकूण 10 वजनी गटांत (50 किलो ते 76 किलो) पार पडणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन विजेत्यांना पदके मिळतीलच, पण सर्वांचे आकर्षण असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावणाऱ्या महिला मल्लाला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.