Advertisement
अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे : थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई
मुंबई : नाशिकच्या गुन्हे शाखेने भोंदू कॅप्टन अशोक खरातला महिलेवरील अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. यानंतर त्याचे अनेक कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. पोलिसांना त्याच्या कार्यालयात 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले असून, यामध्ये नेमकं काय आहे तपासानंतर उघड होईल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापुर्वीच संबंधित प्रकरणात लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी बोलून यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. संबंधित प्रकरणांचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे आता समोर आले आहे.
याप्रकरणात महत्वाचे सर्व गंभीर पुरावे, व्हिडिओ अश्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. अशोक खरातला थांगपत्ता लागू न देता पहिल्यांदा पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आणि मग कारवाई केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करत थेट लक्ष घातल्यानं खरात याची सगळीकडून कोंडी करण्यात आल्याचं समजत आहे. अनेक हायप्रोफाईल व्यक्ती यात गुंतल्याचे लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा पुरावे गोळा केले गेले असल्याची माहिती आहे.
कॅप्टन खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. 18 फेब्रुवारी रोजी IT कलम 66 ( E ), 67 ( A ) आणि 351 ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. ज्योतिष कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती माहिती आहे.
कॅप्टन खरात प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून, तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राइम ब्रँच च्या ताब्यात आहेत. 24 मार्चपर्यंत कॅप्टन खरात याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. SIT स्थापन झाल्याने कॅप्टन खरातचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.
मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा
स्वघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रँचने छापा टाकला, खरातच्या मिरगाव मधीलफार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तर खरातच्या फॉर्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. एक पिस्तूल आणि काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
