#

Advertisement

Friday, March 20, 2026, March 20, 2026 WIB
Last Updated 2026-03-20T14:18:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तात्काळ राजीनामा द्या !

Advertisement

मुख्यमंत्र्यांचे रुपाली चाकणकरांना आदेश

मुंबई : अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता रुपाली चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.