#

Advertisement

Friday, March 20, 2026, March 20, 2026 WIB
Last Updated 2026-03-20T14:24:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुराव्यासह सगळी उत्तर देणार : रुपाली चाकणकर

Advertisement

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांकडून चाकणकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच रुपाली चाकणकर लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सध्या निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याची माहिती चाकणकर यांनी  दिली.
एखाद्या व्यक्ती सोबत फोटो असतील तर तो गुन्हा आहे का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केला आहे. सध्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची पुराव्यासह उत्तर देणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. नुकतीच रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत  भेट घेऊन प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर चाकणकर आता पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पुण्यात जाऊन त्या सुनेत्रा पवार यांची देखील आजच भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा : लक्ष्मण हाके
सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. तसेच महायुतीने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील ओबीसी आरक्षणावरून हाके यांनी केला आहे.