#

Advertisement

Friday, March 27, 2026, March 27, 2026 WIB
Last Updated 2026-03-27T16:48:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार ?

Advertisement

नाशिक पोलीस आयुक्तांची माहिती ; कडक चौकशी होणार  

मुंबई : अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर त्याचे राजकीय लागेबंध समोर आले. त्यानंतर याच प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु,आता त्यांची चौकशी करावी, त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी विरोधकांनी केली. यासंबंधी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठी माहिती दिली. या प्रकरणात तपास सुरू असून पुढे काही गोष्टी समोर आल्या तर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसाची भूमिका स्पष्ट केली आहे,  खरातला अटक केल्यानंतर कुणाचाही फोन आला नाही, किंवा दबाव टाकण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही. आमच्याकडे सुरुवातीला जी तक्रार आली होती, त्यानुसार या प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नव्हता किंवा दबाव नव्हता. पण, आम्ही आरोपीला अटक केल्यानंतर काही गोष्टी बाहेर आल्या. शिर्डीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला होता किंवा इतर ठिकाणी काही झाले होते हे नंतर समोर आले. इतर ठिकाणी काही गुन्हे झाले आहेत ते सर्व विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढे मागे यातून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असं संदीप कर्णिक यांनी सांगितले.