#

Advertisement

Friday, March 27, 2026, March 27, 2026 WIB
Last Updated 2026-03-27T16:58:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा

Advertisement

निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजीनामा देत असल्याचे केले स्पष्ट 

मुंबई : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.