Advertisement
राज्यसभेसाठी उमेदवारी मिळणार नाही
दिल्ली : राज्यसभेसाठी महायुतीकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, अशातच रामदास आठवले यांना मोठा झटका बसणार आहे. भाजपकडून रामदास आठवले यांचा पत्ता कट होण्याची चर्चा रंगली आहे. रामदास आठवले यांना उमेदवारी दिली जाणरा नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामुळे येत्या 6 महिन्यात रामदास आठवले यांचे मंत्रीपद जाणार अशी चर्चा रंगली आहे.
देशभरातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आलेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचाही समावेश आहे. राज्यसभेच्या या जागांसाठी 16 मार्च 2026 ला निवडणूक पार पडणार आहे. त्याच दिवशी निकाल लागणार आहेत. शरद पवार( राष्ट्रवादी SP), रामदास आठवले (रिपाइं(ए)) महायुती, डॉ. भागवत कराड - भाजप, धैर्यशील पाटील, भाजप रजनी पाटील - काँग्रेस, प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना UBT, फौजिया खान - राष्ट्रवादी SP हे खासदार महाराष्ट्रातून एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणार आहेत.
रामदास आठवले यांचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. रामदास आठवले हे राज्यसभा खासदार आहेत. आता मात्र, राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आठवलेंना देण्यात आली आहे. नितीन नबीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. दिल्लीवरून मुंबईत येताच रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी रामदास आठवले प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
