Advertisement
ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मानले राज्य शासनाचे आभार
मुंबइ : राज्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात नवे बदल करत काही जुन्या योजनांना कात्री लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असताना लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. लाडकी बहिण योजना कायम सुरू ठेवण्याबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच आग्रह धरला होता, ही योजना सुरू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे, ही बाब लक्षात घेत अशीच सुरू राहणार असून यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला उप प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री तसेच महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलाना दरमहा मिळणारे दीड हजार रुपये अनुदान मंगळवेढा तालुक्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी करून देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नसल्याने तसेच या योजनेसाठी पात्र आहोत की अपात्र याची माहिती कोठेही मिळत नसल्याने ही योजना बंद झाली की काय, लाभार्थी म्हणून आमची नावे काढून घेतली की काय, अशा शंका लाभार्थी लाडक्या बहिणींच्या मनात होत्या. अशा काही कारणांतून बँकांच्या चकरा मारून लाभार्थी बहिणींची ससेहोलपट होत असल्याचे आणि यासंदर्भात हजारो महिलांच्या तक्रारी आल्याने हा मद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला उप प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेत सदर योजनेतील त्रुटींबाबत चर्चा केली होती, तसेच, खऱ्या गरजू लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी करीत पाठपुरावा केला, याची दखल घेत अर्थसंकल्पा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेसंर्दभात महत्त्वाची घोषणा केली, तसेच 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले असल्याने आपल्या मंगळेवेढा तालुक्यातील अधिकाधिक लाभार्थी बहिणींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला उप प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.
