#

Advertisement

Monday, April 20, 2026, April 20, 2026 WIB
Last Updated 2026-04-20T12:41:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भारतीय रेल्वेने विकले 6813.86 रुपयांचे भंगार

Advertisement

2025-26 या आर्थिक उभारला प्रचंड महसूल 

दिल्ली : भारतीय रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जुन्या आणि खराब झालेल्या वस्तूंची विक्री केली आहे. या विक्रीतून रेल्वेला 6813.86 कोटी रुपयांचा महसूल मिळाला भारतीय रेल्वेला मिळाला आहे. या वर्षामध्ये भारतीय सरकारने 6000 कोटी रुपयांचे भंगार विकण्याचे लक्ष ठेवले होते.

रेल्वे मंत्र्यांनी आर्थिक वर्षामधील भंगार विक्रीबद्दल दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची आर्थिक स्थिती 6800 कोटींनी भंगार विक्रीमुळे सुधारली आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2024-25 यामध्ये मध्ये रेल्वेने 6641.78 कोटी रुपयांचे भंगाराची विक्री केली होती. त्यावेळी भारतीय सरकारने 5400 कोटींचे टार्गेट ठेवले होते. आता भारतीय रेल्वेने सलग दुसऱ्यावर्षी भंगार विक्रीची बंपर कमाई केली आहे. 

भारतीय रेल्वेची विक्री कशी केली केली जाते.... याबाबत सांगताना प्रशासनाने सांगितले की, ठिकठिकाणी अनेक रेल्वे डेपो, यार्ड आणि वर्कशॅापमध्ये अनेक जुन्या वस्तू या खराब झालेल्या असतात. यामध्ये जुने इंजिन, डबे, वॅगन, रेल्वे ट्रॅक आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या भंगार विक्रीचा लिलाव केला जातो, यामध्ये ई-लिलावाद्वारे ही भंगार विक्री पूर्णपणे पारदर्शक असते. लिलाव झाल्यानंतर भारतीय रेल्वेला पैसे मिळतात आणि त्यानंतर खराब झालेल्या वस्तूमुळे व्यापलेली जागा ही रिकामी होते. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात असेही सांगितले की या उपक्रमामुळे रेल्वे आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे, त्याचबरोबर त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत होत आहे. जुन्या वस्तूंच्या पुनर्वापरामुळे नासाडी कमी होत आहे.