#

Advertisement

Friday, April 24, 2026, April 24, 2026 WIB
Last Updated 2026-04-24T17:08:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात

Advertisement

 

सोलापूर : भीमा नदी कोरडी पडली होती त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. भीमा नदीकाठच्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीप्रश्न ऐरणीवर होता. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून परवानगी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री नऊ वाजलेपासून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून परवानगी घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री नऊ वाजलेपासून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत होत्या, त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघटना, आमदार, खासदारांनी सातत्याने केली होती. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सोलापूर जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.