#

Advertisement

Monday, April 13, 2026, April 13, 2026 WIB
Last Updated 2026-04-13T17:47:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रूपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांचं अल्टिमेटम

Advertisement

शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी 

शिर्डी : राहत्याच्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यासंदर्भात रूपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी केली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्याच्या मुलाच्या नावावर खाती उघडण्यात आल्याचं समोर आलंय, दरम्यान यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. रूपाली चाकणकरांच्या बहिणीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार आहे. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारप्रकरणी चौकशी होणार आहे.
रूपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांनी 8 तास चौकशी केली, समता पतसंस्थेत असलेल्या खात्यामुळे त्या चौकशीच्या फे-यात अडकल्या आहेत. समता पतसंस्थेतील खात्याबाबत प्रतिभा चाकणकरांना विचारणा करण्यात आली, तसंच त्यांच्या मुलाच्या नावावर देखील दोन खाती असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे प्रतिभा चाकणकर या त्यांच्या मुलासह चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावानं उघडण्यात आलेल्या खात्यांना खरात नॉमिनी या खात्यांवरून तब्बल 2 कोटी 40 लाख रूपयांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी समोर आणली आहे. दरम्यान या खात्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलंय.. ही खाती मी उघडलेली नाहीत, तसंच सह्या देखील बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केलाय. देवदर्शनाच्या नावाखाली कागदपत्र घेऊन खाती उघडण्यात आल्याचा आरोप प्रतिभा चाकणकरांनी केला आहे. समता पतसंस्थेमधील खाती बनावट, सह्या देखील बनावटच-प्रतिभा चाकणकर त्या खात्यांच्या माध्यमातून मी एकही रूपयाची उलाढा केली नसल्याचे प्रतिभा चाकणकर यांनी जबाबात म्हटले आहे. आम्ही पोलिसांना सह्यांचे नमुने दिले आहेत. शिर्डी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करू, पुढील कायदेशीर कारवाईबाबत चर्चा सुरू असल्याचं प्रतिभा चाकणकरांच्या वकील जयश्री काळेंनी म्हटलं आहे.