Advertisement
विधानसभा पोटनिवडणुकी मांडले स्पष्ट मत
पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असल्याचे तसेच स्थानिक पातळीवरील समीकरणांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्ष नेतृत्व योग्य उमेदवार निवडण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे समजते. अन्य काही मंडळीही बारामतीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. परंतु, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीसाठी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठीचे योगदान लक्षात घेता बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देऊन अजितदादांप्रती बारामतीकरांनी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेत दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतला आहे. या दोन्ही मतदारसंघात मित्रपक्षांशी चर्चा करूनच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी आघाडीचा विचार करून किमान बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात तरी काँग्रेसने उमदेवार देवू नये, ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी बसून बारामती मतदार संघाबाबत बिनविरोधचा सकारात्मक निर्णय घ्यावा, बारामती मध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्या पक्षातून ही निवडणूक लढणार नाहीत त्यामुळे अन्य पक्ष तसेच इतर उमेदवारांनीही केवळ राजकारण म्हणून सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देण्याबाबत विरोध करू नये, असेही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
