Advertisement
मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तत्पूर्वी 25 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. आता, आणखी आयएएस 5 (IAS)अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे साईओ कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बी. एन. पाटील (आयएएस: नॉन-एससीएस: 2014), संचालक, पर्यटन, मुंबई यांची प्रकल्प संचालक, रुसा, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. मंगेश जोशी (आयएएस: एससीएस: 2015), उपमहासंचालक, यशदा, पुणे यांची संचालक, पर्यटन, मुंबई येथे बदली झाली आहे. कुशल जैन (आयएएस: आरआर: 2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहायक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, रेवैया डोंगरे (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, भूम उपविभाग, धाराशिव यांना यवतमाळ येथे प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
