#

Advertisement

Wednesday, April 22, 2026, April 22, 2026 WIB
Last Updated 2026-04-22T15:01:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विजयसिंह मोहिते मुख्यमंत्र्याच्या भेटीला

Advertisement

पुत्र रणजितसिंह मोहिते यांच्यासाठी पुन्हा प्रयत्न 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी गाठीभेटी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते. विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते यांची पुन्हा विधान परिषदेवर वर्णी लागावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याची चर्चा सुरु आहे.  विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी, विखे पाटील मंत्रालयात दाखल असताना दोघांचीही भेट झाली. विजयसिंह मोहिते पाटील हे रणजीतसिंह मोहिते यांना पुन्हा विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याची चर्चा आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची टर्म येत्या 13 मे रोजी संपत आहे.

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.