#

Advertisement

Monday, April 6, 2026, April 06, 2026 WIB
Last Updated 2026-04-06T12:56:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती : छत्रपती संभाजीराजे

Advertisement

महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान 

बारामती : दिवंगत पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर तिथे का निवडणूक झाली पाहीजे? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी केला. सार्वत्रिक निवडणुकीत कोणीही उभं रहावे. ही निवडणुक मात्र बिनविरोध व्हावी. काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या प्रश्नावर संभाजीराजे बोलत होते. 

सुनेत्रा पवार म्हणतात की....
बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे.