#

Advertisement

Monday, April 6, 2026, April 06, 2026 WIB
Last Updated 2026-04-06T12:33:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवार यांनी अर्ज केला दाखल

Advertisement

बारामती विधानसभा पोटनिवडणूक 

बारामती : विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता, त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असल्याने शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आवर्जुन उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यात राज्यभरातून राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, महिला नेत्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण केले, यावेळी, सभागृहात अजित पवारांच्या आठवणींनी अनेकदा भावनिक वातावरण पाहायला मिळाले.  मेळाव्यानंतर सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार पार्थ पवार तसेच  छगन भुजबळ, धनंजय मुंडें निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील महिला नेत्या प्रामुख्याने सोबत असतात. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार सरोज अहिर आणि आमदार सना मलिक या तीन महिला नेत्या निवडणूक कार्यालयात पाहायला मिळाल्या.