#

Advertisement

Tuesday, May 19, 2026, May 19, 2026 WIB
Last Updated 2026-05-19T13:20:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबईत ठरणार राज्यव्यापी आंदोलनाची रणनीती

Advertisement

आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्यावरून सरकारविरोधात बहुजन रयत परिषदेचा एल्गार 

मुंबई : आरक्षण वर्गीकरणाबाबत माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल मंजूर होऊनही अंमलबजावणीत होत असलेल्या शासकीय दिरंगाईविरोधात आता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या या मनमानीविरोधात दबाव गट निर्माण करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी मंगळवार, दि. 19 में 2026 रोजी मुंबईतील 'प्रेस क्लब' येथे राज्यभरातील प्रमुख कार्यकत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बहुजन स्थत परिषदेच्या वतीने बोलावण्यात आली आहे. माजी न्या, अनंत बदर समितीने तयार केलेला आरक्षण वर्गीकरणाचा आराखडा राज्य मंत्रिमंडळाने आधीच स्वीकारला आहे. त्यातील कोणत्या  शिफारशी लागू करायच्या आणि कोणत्या वगळायच्या, याचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती गठीत करण्यात आली होती. कॅबिनेटच्च्या निर्णयानुसार या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करायचा होता. परंतु, आज दोन महिने उलटून गेले तरीही हा अहवाल मंत्रिमंडळासमोर आलेला नाही. शासनाच्या या संघ आणि उदासीन कारभाराविरोधात समाजबांधवांमध्ये तीव्र संताप आहे.

आता केवळ मागण्या न करता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रेस अब मुंबई, आझाद मैदानाशेजारी, मुंबई महानगरपालिका प्रशासकीय इमारतीसमोर, मुंबई, याठिकाणी सकाळी 11 ते 4 या वेळेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची रणनीती बैठक पार पडेल आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची अधिकृत घोषणा केली जाईल. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल ई साळुंखे ढोबळे यांनी केले आहे.