Advertisement
बहुजनांचे लोकनेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम
मंगळवेढा : माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, बहुजनांचे लोकनेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रा. ढोबळे यांचा सत्कार करण्यासाठी मंगळवेढ्यात सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी गर्दी केली होती. यातून ढोबळे यांची सर्वपक्षीय संबंधी सलोख्याचे असल्याचे दिसून आले.सोमवारी (ता. 18) येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सर्वपक्षीयांनी सत्कार करण्यात आला. केला.
विशेष म्हणजे बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल सांळुखे-ढोबळे यांनी वाढदिनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात सर्वत्र समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, 20 वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधीत्व केलेल्या ढोबळे यांनी तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक पटलावर त्यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना आपले अस्तित्व निर्माण केलेे. काँग्रेसमधून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विसावला तरीही राजकीय पटलावर त्यांनी साहित्य, कला, राजकीय व शैक्षणिक घटकांत अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले हेच आजच्या वाढदिनी शुभेच्छा कार्यक्रमांवेळी दिसून आले.
शाहू शिक्षण संस्थेतही विविध कार्यक्रम
दरम्यान, शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित सर्व शाखांमध्ये संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बहिणाबाई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कुसुमाग्रज प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक प्रशाला यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
