#

Advertisement

Tuesday, May 26, 2026, May 26, 2026 WIB
Last Updated 2026-05-26T17:46:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जयंत पाटील यांचे भाचे "भाजप"च्या वाटेवर

Advertisement

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार 

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे याचं ठरलं असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचं निश्चित झालं आहे. मंगळवारी रात्री त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असून बुधवारी किंवा गुरूवारी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का असेल अशी चर्चा आहे. 

तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय: प्राजक्त तनपुरे
राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती.