#

Advertisement

Wednesday, May 27, 2026, May 27, 2026 WIB
Last Updated 2026-05-27T11:34:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार

Advertisement


जागावाटपही जवळपास निश्चित 

मुंबई : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे 17 जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवणार आहे. येत्या 18 जून रोजी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
या 17 जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना पाच ते सहा जागा लढणार आहे. त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ते चार जागावर लढणार असल्याची माहिती आहे.कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 26 तारखेला मविआ नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे तो ती लढवेल अशी माहिती आहे. त्यानुसार चंद्रपूर, सांगली-सातारा या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. तर परभणी, हिंगोलीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यानुसार जागावाटप होणार असल्याची माहिती आहे.  

निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • अधिसूचना जारी : 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
  • अर्जाची छाननी : 2 जून
  • अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
  • मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.
  • मतमोजणी : 22 जून