#

Advertisement

Wednesday, May 20, 2026, May 20, 2026 WIB
Last Updated 2026-05-20T11:42:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवराज मोटेगावकर किती रुपये फी आकारायचे ?

Advertisement

महाराष्ट्रभर जाळे, हजारो विद्यार्थी, शेकडो कर्मचारी, कोट्यवधीचे अर्थकारण

पुणे : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. शिवराज मोटेगावकरचे लातूर, पुणे, हडपसर, पिंपरी, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी ब्रांचेस आहेत. अकरावीची फीस 60 हजार रुपये....बारावीची 60 हजार रुपये...या साठ हजार रुपयांमध्ये वर्षभराचे शिक्षण नीट किंवा जीइची तयारी याची शुल्क यातच समाविष्ट केलेले आहे. एका विद्यार्थ्याला एका वर्षाची फिश ही 60 हजार रुपये आहे. त्यांच्या सर्व ब्रांचमध्ये मिळून जवळपास 25 ते 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यामुळे हे अर्थकारण कोट्यावधीचे उड्डाण करताना दिसून येते, त्याचे साम्राज्य किमान १०० कोटी पेक्षा जास्त असल्याची चर्चा आहे.  

देशभरातील प्रत्येक राज्यातून या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक संख्या ही उत्तर भारतातल्या हिंदी भाषिक शिक्षकांची अधिक आहे.. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षक शिकवायला येतात. उत्तर भारतातून आलेल्या हिंदी भाषिक शिक्षकांची मासिक वेतनही लाखाच्या घरात आहे. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात त्यासाठी उभा टाकलेला कर्मचारी वर्ग यंत्रणा सुरक्षारक्षक क्लर्क अशी हजारो लोक या क्लासेसमध्ये काम करतात.

लातूर येथील उद्योग भवन परिसरात ट्युशनचे जाळे आहे. लातूर मधील आणि भारतातील विविध क्लासेस या ठिकाणी चालतात. 27 एकर परिसरातील या या ट्युशन एरियामध्ये प्रत्येक रस्त्याला शिवराज मोटेगावकर यांचे एक युनिट आहे. मागच्या 23 वर्षात सातत्याने होत गेलेला प्रगतीचा आलेख डोळे दिपवणारा आहे. 

RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या 43 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मोटेगावकर पेपरफुटी प्रकरणावर तीव्र भूमिका मांडताना दिसत आहेत. यापूर्वी  देशात पेपरफुटीच्या घटना समोर आल्यानंतर मोटेगावकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या वेळी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा त्यांनी जोरदारपणे मांडला होता. 

मात्र, आता NEET पेपरफुटी प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्यानंतर हाच जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. त्यामुळे त्या वेळी पेपरफुटीविरोधात बोलणारे मोटेगावकर आता स्वतःच आरोपांच्या भोवऱ्यात अडकले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.