Advertisement
मुुंबई येथे अॅड. कोमल साळुंंखे-ढोबळे यांनी मांडली भूमिका
मुंबई : अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ, ब, क, ड, असे चार प्रवर्ग निर्माण करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु, याकडे केवळ आरक्षणाचा मुद्दा म्हणून पाहिले जात असल्याने मूळ मुद्याकडेच दुर्लक्ष होत आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित निर्णय होणे गरजेचे आहे, या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील लाखो कुटुंबांना लाभ मिळेल, अशी अपेक्षा अॅड. कोमल साळुंखेे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अॅड. कोमल साळुंखेे-ढोबळे बोलत होत्या. या मुद्यावर समाजाने एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत अनुसुचित जातीतील लोकसंख्येचे अ, ब, क, ड, नुसार आरक्षण का महत्त्वाचे आहे, चार प्रवर्ग निर्माण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, अनुसूचित जाती आरक्षणाची आंध्र प्रदेशातील आंदोलनातून पडली पहिली ठिणगी, 24 वर्षे समाज न्याय मागणीसाठी कसा झटत आहे, अनुसूचित जातीमध्ये असलेला 59 जातींचा समावेश, यामध्ये आरक्षणाची टक्केवारी, अनुसूचित जातीमधील समाजघटकांनी जातनिहाय आरक्षण का गरजेचे आहे, आरक्षण हे जातीवर नसून समूहावर अवलंबून कसे आहे, याबाबत सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणखी सहा राज्यांचे सादर झालेले अहवाल मातंग समाजाचे मिळणारे पाठबळ आदी मुद्यांवरही अॅड. कोमल साळुंखेे-ढोबळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
