#

Advertisement

Monday, June 22, 2026, June 22, 2026 WIB
Last Updated 2026-06-22T16:58:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधान परिषदेचा संपूर्ण 17 जागांचा निकाल

Advertisement

भाजप 11 पैकी 11, शिवसेना 4 पैकी 3, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 जागा जिंकल्या

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result 2026) महायुतीचा बोलबाला राहिला. तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली. राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर  एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. भाजप, 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली होती. मात्र या निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला.
17 जागांसाठी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 असा महायुतीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानूसार भाजपने 11, शिवसेनेने 4 आमि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 2 पैकी 2 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागा जिंकल्या. नाशिकची जागा महायुतीमधील शिवसेनेला सुटली होती. परंतु गोकुळ गीते यांनी बंडखोरी केली आणि त्याचाच फटका शिवसेनेला बसला. नाशिकमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभव केला.

महाराष्ट्र विधान परिषद - 17 जागांचा निकाल (Vidhan Parishad Election Result 2026)
     
अ.क्र.मतदारसंघ (जिल्हा)विजयी उमेदवारपक्षनिकाल
1ठाणेरवींद्र फाटकशिवसेनाबिनविरोध विजयी
2यवतमाळदुष्यंत चतुर्वेदीशिवसेनाबिनविरोध विजयी
3रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्गअनिकेत तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसबिनविरोध विजयी
4पुणेविक्रम काकडेराष्ट्रवादी काँग्रेसबिनविरोध विजयी
5वर्धा - गडचिरोली - चंद्रपूरअरुण लखाणीभाजपबिनविरोध विजयी
6अहिल्यानगरप्राजक्त तनपुरेभाजपबिनविरोध विजयी
7छत्रपती संभाजीनगर - जालनासुहास शिरसाटभाजपविजयी
8नाशिकगोकुळ गितेअपक्ष (भाजप बंडखोर)विजयी
9भंडारा - गोंदियाअविनाश ब्राह्मणकरभाजपविजयी
10सांगली - साताराधैर्यशील कदमभाजपविजयी
11परभणी - हिंगोलीसईद खानशिवसेनाविजयी
12सोलापूरराजेंद्र राऊतभाजपविजयी
13धाराशिव - लातूर - बीडबसवराज पाटीलभाजपविजयी
14नागपूरराजीव पोतदारभाजपविजयी
15जळगावनंदकिशोर महाजनभाजपविजयी
16अमरावतीप्रवीण पोटेभाजपविजयी
17नांदेडअमर राजूरकरभाजपविजयी