#

Advertisement

Monday, June 22, 2026, June 22, 2026 WIB
Last Updated 2026-06-22T17:05:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजेंद्र राऊत यांची मोहिते पाटलांवर बोचरी टीका

Advertisement

विधानपरिषदेत विजय : विधानसभेत अपघातानं पराभव झाला होता 

सोलापूर : 'इतका अहंकार बरा नाही' असं म्हणत सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत विजय झाल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अपघात होता. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिली. सोलापूर विधानपरिषदेचे विजयी मिळवल्यानंतर उमेदवार राजेंद्र राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांचं अभिनंदन केलं आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या विजयाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री यांनी दिल्या. तर राऊत यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
माळशिरसमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात आतापर्यंत एकटा रामभाऊ लढत होता, आता रामभाऊ आणि राजाभाऊ दोघे मिळून लढतील. असे म्हणत माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर राजेंद्र राऊत यांच्या समर्थकाकडून मोठा जल्लोष करण्यात आला. सोलापुरात फटाक्यांची अतिशबाजी, गुलालची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर अदृश्य शक्ती मोहिते पाटलांच्या कामी आली नसल्याचे बॅनरबाजी करतं कार्यकर्त्यांकडून टीका केली जात आहे.