#

Advertisement

Friday, June 26, 2026, June 26, 2026 WIB
Last Updated 2026-06-26T17:33:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'वधू' म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी 'नवरीची आई' म्हणून पुन्हा नेसली

Advertisement

सुप्रिया सुळेंनी शेअर केली पैठणीची गोष्ट

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती हिचे लग्न 20 जूनला नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत झाले. या लग्नसोहळ्यात सुप्रिया सुळे यांनी परिधान केलेल्या पैठणीची गोष्ट सांगितली आहे. सुप्रिया सुळे यांनी 35 वर्षांपूर्वी 4 मार्च 1991 ला वधू म्हणून स्वत:च्या लग्नात नेसलेली पैठणी नवरीची आई म्हणून रेवती आणि सारंग यांच्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी 'वधू' म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी 'नवरीची आई' म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला. ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली. काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं