#

Advertisement

Friday, June 26, 2026, June 26, 2026 WIB
Last Updated 2026-06-26T17:54:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"एपस्टीन फाईल्स"चा फर्स्ट लूक

Advertisement

मुख्य भूमिकेत दिपाली सय्यद : अन्य अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम

मुंबई :  'महाराष्ट्र एपस्टिन फाईल' या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. 2 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत सिनेमाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. 'आता सगळं उघड होणार...!', असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे.