Advertisement
अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली खंत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा दिवंगत अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले अमोल मिटकरी सध्या पक्षात साईडलाईन झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल त्यांनी थेट नाराजी बालून दाखवली. एकीकडे राज्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचं सांगत महायुती सरकार आणि कृषीमंत्री लोकांपर्यंत पोहोचत आहेत. शेतकऱ्यांसाठी हे सरकार तत्पर असल्याचं सांगत आहेत. मात्र, एका शेतकरी आंदोलनातून दत्तात्रय भरणेंना अमोल मिटकरींसह अकोल्यातील शेतकऱ्यांनी फोन लावला होता. मात्र, कृषीमंत्र्यांनी त्यांचा फोन घेतला नाही, नंतर फोन केलाही नाही. त्यावरुन, मिटकरींनी थेट नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांचा पक्षातील मंत्र्यालाच घरचा आहेर दिला आहे. कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक न्याय तर भाजपच्या आमदारांसाठी वेगळा न्याय असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शेतकरी आंदोलनातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून कृषीमंत्री दत्तमामा भरणे यांच्याशी आपण 4 वेळा संपर्क साधला. पण, कोणताही प्रतिसाद मंत्र्यांनी दिला नाही दुसरीकडे भाजप आमदार रवी राणा यांनी संपर्क करताच तत्काळ तत्परता दाखवल्याचा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.
धन्यवाद आदरणीय दत्तात्रय भरणे साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी आंदोलनातून याच दिवशी आपल्याला चार ते पाच वेळा संपर्क केल्यावर आपण ना कॉल उचलले ना परत अकोल्यातील शेतकरी व त्याचे काय झाले याबद्दल कॉल करून साधी विचारपूस केली. मात्र, आमदार रवी राणा यांच्याबद्दल किती हो तत्परता दाखवली. मानल तुम्हाला घरकी मुर्गी दाल बराबर, असे म्हणत अमोल मिटकरींनी आपला दत्तात्रय भरणेंच्या कृतीवर आपला रोष व्यक्त केला आहे.
