#

Advertisement

Monday, July 6, 2026, July 06, 2026 WIB
Last Updated 2026-07-06T18:13:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लाजा नाही वाटत ? निर्लज्जपणे चालू आहे : अमित ठाकरेंचा प्रहार

Advertisement

मुंबई : "काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सबळ चालू आह, अशा शब्दात मनसे नेने अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला. अमित ठाकरे यांनी मुंबईत महापालिकेच्या गलथान कारभाराने शाॅक लागलेल्या दोन मुलींची भेट घेतली. यावेळी फोडाफोडीवर संताप व्यक्त केला.
महानगरपालिकेमुळे शॉक लागून दोन मुली बिचाऱ्या हॉस्पिटल बेडवर आहेत, मुंबईमध्ये झाडं कोसळून लोक मरतायत, पॉट होलमध्ये जाऊन लोक मरतायत. ते पुढे म्हणाले की, तो भाजपचा तो, लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. मी या विषयावर काय बोलायचं? मला वाटतं की आपल्याला राग नाही येत का? नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय यापेक्षा घाण काय असू शकतं? सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे. तुम्ही का हसताय? कारण का तर तीन वर्ष निवडणुका नाहीयेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितलाय, असा हल्लाबोल अमित ठाकरे यांनी केला.
मिसिंग लिंकवरून ते म्हणाले की, स्लॅब कोसळून बंद पडलंय आणि मुख्यमंत्री साहेब बोलतायत की हे ट्रायल आणि एरर आहे. पहिला पावसाचा ट्रायल असतो. एक ब्रिज कोसळला समजा, तर उद्या तुम्ही सांगणार की हे आमचं ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला आमच्या चुका कळल्या आता, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. अमित ठाकरे म्हणाले की, तुम्ही शिवसेनेला बोलता, पण मुंबईत भाजप सत्तेत होतं, आता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला. तुम्ही त्यांच्याबरोबर नव्हता? अशी विचारणा त्यांनी केली. 25 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर नव्हता का? राज साहेबांना संधी मिळाली नाशिकमध्ये, एकही करप्शनचा आरोप नाही, रस्त्यावर खड्डे नाहीत, नाशिक तुंबलं नाही, लोकं मेली नाहीत. आपण या प्रश्नांवर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत? नीच प्रकारचं राजकारण चालू आहे, मी एवढंच सांगतो तुम्हाला, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.