Advertisement
तातडीने आढावा घेऊन आणीबाणी जाहीर करण्याचीही मागणी
मुंबई : खरं तर मला विश्वासच बसत नाही कि ज्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा इतका गांजावाजा करत कार्यक्रम झाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनीच त्याचे कौतुक केलं. सध्या कॉस्टमध्ये पडायला नको कारण तो वेगळा विषय आहे. मात्र ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडीओ येतोय हे अतिशय चिंताजनक आहे. राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं चित्र पूर्वी नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय? यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करणं अतिशय आवश्यक आहे. राज्यात एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया यांनी केली आहे.
सध्या उर्वरित महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न आहे. राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. पण असं चित्र पूर्वी नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक आहे. मी राज्यातील सगळ्यांना विनंती करते की या दिवसात शक्य तितका प्रवास टाळावा. तर दुसरीकडे माझी आग्रही मागणी आहे की, महाराष्ट्रातील सर्व पायाभूत सुविधांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकाराला मी करप्शन म्हणणार नाही. कारण की त्या संदर्भात अद्याप माहिती आलेली नाही. मात्र, या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एकूण किती खर्च झाला, सेफ्टी संदर्भात ऑडिट झाला का, आणि जर झाला असेल तर यात नैसर्गिक आपत्ती संदर्भात विचार केला की नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र सरकारला द्यावी लागणार, असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
