Advertisement
भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच प्रत्युत्तर
मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकरयांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे. अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सीजेपीच्या आंदोलनावर टीका केली होती. अशातच या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या कि, 'अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका. अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी प्रहार केला आहे.
संविधानाने दिलेल्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत मत मांडण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, लोकशाहीवर हल्ला आहे. असेही रोहिणी खडसे म्हणाल्या. तरुणांच्या हातात रोजगार, शिक्षण आणि भविष्याची हमी देण्याऐवजी त्यांच्या हातात जखमा देण्याचे काम होत असेल, तर हा लोकशाहीचा नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे. सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा! असेही त्या म्हणाल्या.
