#

Advertisement

Thursday, July 16, 2026, July 16, 2026 WIB
Last Updated 2026-07-16T14:22:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्याची धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी !

Advertisement

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य 

मुंबई  : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी, अशी थेट इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वात जावे, अशी राज्यातील अनेकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीने देशाच्या प्रमुख पदावर विराजमान व्हावे, यासाठी योग्य वेळ लवकरच येईल. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले, तर राज्याचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपल्या पक्षाचाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. त्याचप्रमाणे मलाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते," असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिवंगत अजित पवारयांच्या भीषण विमान अपघातालाआणि निधनाला पाच महिने उलटून गेले आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह राज्याच्या अर्थखात्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अजित दादांच्या खांद्यावर होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर, समोरच अर्थसंकल्प असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्पुरती अर्थखात्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनीच अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेसोपवले जाईल अशी शक्यता होती, मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला नाही. यावरून दत्तात्रय भरणे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. अर्थ खात्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबाबत सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल. अर्थ खात्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.