#

Advertisement

Tuesday, August 18, 2026, August 18, 2026 WIB
Last Updated 2026-08-18T18:03:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यात 10,502.36 कोटींचा सर्वात मोठा प्रोजेक्ट मंंजूर

Advertisement

पुणे  : पुण्यातील चाकण MIDC मधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याची घोषणा केली.  खड्डे, अभूतपूर्व वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर समस्यांना वैतागून चाकण MIDC मधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे एकाचवेळी 4000 लोक बेरोजगोर होणार असून 1000 कोटींचे नुकसान होणार आहे. यावरुन राज्याचे राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांभीर्याने देखल घेतली. यानंतर आता सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. पुण्यात 10,502.36 कोटींचा सर्वात मोठा प्रोजेक्ट मंंजूर करण्यात आला आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारीकरण प्रकल्पाच्या 10,502.36 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे.  महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी (वळती) ते पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे (बु.) (शिवरे) या 31.805 किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणे हा या रिंग रोडचा उद्देश आहे. संपूर्ण 168.981 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची सलगता सुनिश्चित झाल्यानंतर एकात्मिक प्रवेश नियंत्रित मार्गिका पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी 80% भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या मार्गावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी 3 मार्गिका असतील. मार्गाची नियोजित वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असून, प्रकल्पात 1 इंटरचेंज, 3 मोठे पूल, 5 लहान पूल, 18 उन्नत मार्ग किंवा उड्डाणपूल आणि 4 बोगद्यांचा समावेश आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण तसेच इंटरचेंजजवळ लँडस्केपिंग प्रस्तावित आहे. वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या रिंगरोडमुळे मोटा दिलासा मिळणार आहे. पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी राज्य सरकारची परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विस्तारीत पुणे रिंग रोडमुळे MIDC परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. चाकणच्या जवळपास रिंग रोड उभारला जाणार आहे.