Advertisement
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार
मुंबई : मुंबई तील भाजपचे आमदार पराग शहा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पराग शहा यांचा मुबंईच्या रस्त्यावर भिक मागतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पराग शहा हे महाराष्ट्रातीलच नाही संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांच्याकडे 33830000000 रुपयांची संपत्ती आहे. पराग शहा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 90 पट श्रीमंत आहेत. यावरुनच त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज येतो.
महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा हे घाटकोपर पूर्व येथील भाजपचे आमदार आहेत. पराग शाह यांची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. पराग शहा हे भारतातील पहिल्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. पराग शहा यांच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील. 2024 विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती 3353.06 कोटी इतकी असल्याचे नमूद केले. पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते.
प्रतिज्ञा पत्रात नमूद केल्यानुसार पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67 कोटींची अचल मालमत्ता आहे. स्वतःच्या नावावर 2,179 कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136 कोटींची संपत्ती आहे. पराग शाह हे रिअल इस्टेट बिल्डर आहेत. रिअल इस्टेट व्यवसायात त्यांचा चांगला जम आहे. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती अंदाजे 37.68 कोटी रुपये आहे. एकनाथ शिंदे यांची संपत्तीसह पराग शाह यांच्या संपत्तीची तुलना केली असता आकडा चकित करणारा आहे. एकनाथ शिंदे यांची संपत्ती 37.68 कोटी रुपये आहे. पराग शहा यांची संपत्ती 37.68 कोटींच्या 90 पट म्हणजेच 3353.06 कोटी इतकी आहे.
गुरूंच्या आदेशाने एक दिवस .......
पराग शहा यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. पण तरी सुद्धा भिकारी जसं जगतात तसा एक दिवस त्यांनी रस्त्यावर बसून तितेच खाऊन काढला आहे. याला कारणीभूत ठरलाय त्यांच्या गुरुचा एक आदेश. सध्या जैनधर्मियांचा चातुर्मास सुरु. त्यात पराग शहा यांचे गुरु नम्रमुनी यांनी पराग शहा यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला. गुरुचा आदेश शिरसावंद्य मानत पराग शहांनी सर्व महागड्या गाड्या, सुरक्षाव्यवस्था दूर केली. भिकाऱ्याचा वेष धारण केला आणि घाटकोपरमधल्या रस्त्यावर ते याच वेषात फिरले. फक्त इतकंच नाही तर त्या दिवशीचं जेवण सुद्धा त्यांनी भिक मागून खाल्लं. दिवसभर भिकाऱ्यासारखेच रस्त्याच्या कडेला बसून राहिले. दिवस सरल्यावर भिकाऱ्याचा वेष बदलून पुन्हा आपल्या मुळ रुपात गेले आमि लोकांशी संवाद साधला.
