Advertisement
ट्रोलिंगवरती अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवरती भाष्य केलं आहे, त्या म्हणाल्या की, “मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी मला दिली गेली आहे. तर गरब्यामध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार होऊ नये, याकरिता मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहे. जगात सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्माला मानलं जातं. ते लोक सर्व धर्माच्या लोकांचा समावेश आपल्या उत्सवात करतात. नवीन वर्षाचे ख्रिसमस असो त्यांनी लोकांना सेलिब्रेट करायला लावले. त्याच पध्दतीने हिंदू धर्मात व्हावे. आपले सुद्धा दहीहंडी, नवरात्र, गरबा हे चांगले सण आहेत. कोणी श्रद्धेने, कोणत्याही जातीचा श्रद्धेने त्या ठिकाणी येत असेल आणि अडचणी निर्माण करत नसेल. कुटुंबासोबत विश्वासाचा टिळा लावून येत, असेल तर त्याला येऊ द्यावं, असंही अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे. आपल्या मुलीला वेद, पुराण, महाभारत यांना माहित आहे. स्वतःच्या धर्मावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांना स्वतःचा धर्मावर गर्व आहे का? मग अशा केसेस कमी होतील किंवा हळूहळू या केसेस होणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
